चपातीपेक्षा पराठ्यावर लागणार तीनपट अधिक जीएसटी, आनंद महिंद्रांनी केले मजेशीर ट्विट

पराठा आणि चपातीमध्ये किती फरक आहे ? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमचे उत्तर नक्कीच जास्त काही फरक नाही असे असेल. मात्र आता या दोन्हीमध्ये नक्कीच मोठा फरक आहे. कारण याता या दोन्हींवर वेगवेगळा कर आकारला जाणार आहे. आतापासून पराठा आणि चपातीवर वेगवेगळा जीएसटी आकारला जाणार आहे. अथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग कर्नाटक येथील बेंचने पराठ्यावर चपातीपेक्षा तीनपट अधिक कर लागेल असे सांगितले आहे. म्हणजेच चपातीवर 5 टक्के आणि पराठ्यावर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. हा आदेश रेडी टू कूक मील बनविणारी कंपनी आयडी फ्रेश फूड्सच्या याचिकेनंतर आला आहे. कंपनीने वेगवेगळ्या पराठ्यांवर वेगवेगळ्या जीएसटी संदर्भात स्पष्टीकरण मागितले होते.

आपल्या आदेशात अथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने म्हटले की, चपाती हे आधीपासून बनलेली अथवा पुर्णपणे शिजलेली असते. मात्र पराठ्याला खाण्याआधी गरम करावे लागते. पराठ्याचा 1905 कॅटेगरीमध्ये समावेश करता येणार नाही.

या निर्णयानंतर सोशल मीडियावर 18 टक्के जीएसटी ट्रेंड होऊ लागले. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील यावर मजेशीर ट्विट केले. आनंद महिंद्रांनी लिहिले की, एकीकडे देश अनेक संकटांचा सामना करत असताना अशा स्थितीत आपल्याला वाटते की पराठ्यांच्या बाबत विचार करायला हवा का. कोणतेही प्रकरण असो. भारतीय जुगाड सिस्टम असे आहे की मला विश्वास आहे लवकरच नवीन’ परोटी’ प्रजाती या सर्व वर्गीकरणाला आव्हान देईल.

आनंद महिंद्रांनी या निर्णयावर केलेले हे मजेशीर ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment