बापरे! चोरांना पकडायला गेलेले पोलिसच झाले कोरोनाबाधित

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या संकटाच्या काळात गुन्हेगारांना पकडण्यासाठी कार्य करणाऱ्या पोलिसांना नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. चोरांच्या दोन गँगला पकडणाऱ्या मुंबईतील 10 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर नवी मुंबईतील 15 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एका आरोपीच्या वकिलाला देखील क्वारंटाईन केले आहे. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.

नेहरू नगर पोलीस स्टेशनचे ज्या 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यात 2 अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. या चोरांमध्ये कोरोनाग्रस्त व्यक्ती होता. आता आरोपींना पोलिसांच्या देखरेखेखाली जेजे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की या गँग्सवर इलेक्ट्रिक वस्तूंचे दुकान फोडून जवळपास 5 लाखांचे सामान व रोख रक्कम चोरीचा आरोप आहे. अटक केल्यानंतर सर्वांची कोरोना चाचणी केली. मात्र रिझल्ट येईपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना याची लागण झाली होती.

एका दुसऱ्या प्रकरणात एका 30 वर्षीय व्यक्तीला तळोजा येथील घरात घुसून चोरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पोलिस स्टेशनमधील 15 कर्मचारी आणि आणि एका वकिलाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Leave a Comment