आर्थिक अडचणीमुळे सुंदर पिचाई यांनीही शिक्षण थांबवून केली नोकरी

फोटो साभार झी न्यूज

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आज जगातील बड्या सीईओ मध्ये गलेलठ्ठ पगार घेणारे म्हणून ओळखले जात असले तरी एके काळी त्यांनाही आर्थिक अडचणीमुळे पीएचडी कडे पाठ फिरवून नोकरी करावी लागली होती आणि त्यांनी प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून नोकरी घेतली होती. स्वतः सुंदर यांनी नुकतेच २०२० मध्ये पदवीधर होणाऱ्या विद्यार्थी वर्गाशी यु ट्यूबवरून संवाद साधताना ही गोष्ट सांगितली आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

सुंदर पिचाई यांचे संपूर्ण नाव सुंदर पिचाई सुंदरराजन. १० जूनला ४८ वर्षे पूर्ण केलेले पिचाई आज गुगलचे सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळत असताना त्यांचा पगार आहे वर्षाला ४३,२०० कोटी. कोणत्याही अडचणीवर वेगळ्याच पद्धतीने उपाय शोधणारे म्हणून त्याची ख्याती आहे. एखादी अडचण सोडवायची वेळ आली तर पिचाई वॉक घेतात. अगदी मिटींग सुरु असतानाही त्यांचा असा वॉक घेण्याची सवय आहे आणि ते परततात तेव्हा अडचणीवर वेगळेच सोल्युशन घेऊनच असा अनुभव त्यांचे सहकारी सांगतात.

सुंदर यांचे वडील रघुनाथ इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. सुंदर सांगतात खरगपूर आयआयटी मधून बीटेकची पदवी घेतली आणि १९९५ मध्ये स्टँडफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला तेव्हा वडिलांचा वर्षाचा पगार विमानाचे तिकीट काढण्यासाठी खर्च झाला होता. तो सुंदर यांचाही पहिलाच परदेश आणि विमान प्रवास. शिक्षणासाठी स्कॉलरशिप होती. यशाचे गमक सांगताना ते म्हणाले नशिबाचा भाग होताच पण त्याही पेक्षा अधिक तंत्रज्ञानाची प्रचंड ओढ आणि स्वच्छ बुद्धी सोबत होती.

अमेरिकेत शिक्षण सुरु असताना आर्थिक अडचणी आल्याच. पीएचडी करायचे होते पण आर्थिक अडचणीमुळे नोकरी पकडावी लागली. पिचाई यांनी बीटेक नंतर इन्जिनीअरिन्ग मध्ये मास्टर्स डिग्री घेतली असून त्यानंतर एमबीए केले आहे.

Leave a Comment