२१ जूनचे सूर्यग्रहण या कारणांमुळे ठरणार वेगळे

फोटो साभार सोलर न्यूज

या वर्षी २१ जूनला लागणारे सूर्यग्रहण विशेष दुर्लभ असून खगोलीय स्थितीमुळे ते वेगळे ठरणार आहे. ९०० वर्षांच्या नंतर ही खगोलीय स्थिती पुन्हा येणार असल्याने जगभरातील खगोल तज्ञ, वैज्ञानिक, शिक्षक हे ग्रहण पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हे ग्रहण भारत, द.पूर्व युरोप आणि पूर्ण आशियात दिसणार आहे. गत वर्षी शेवटच्या आठवड्यात या वर्षातील पाहिले ग्रहण संयोग झाला होता. त्यात प्रथम सूर्यग्रहण आणि नंतर चंद्रग्रहण झाले होते यंदा प्रथम चंद्राग्रहण आणि नंतर सूर्यग्रहण होत आहे.

हे ग्रहण वलयाकार स्थितीत दिसेल. ग्रहण काळात वलयाकार स्थिती फक्त ३० सेकंदाची आहे. सौर वैज्ञानिक म्हणून त्याला दुर्लभ म्हणत आहेत. ग्रहण सकाळी १० वा.४२ मिनिटांनी लागेल आणि वलयाकार मध्यकाळ १२.२४ मिनिटांनी असेल. मोक्ष २.७ मिनिटांनी होईल. यावेळी पृथ्वी सूर्यापासून १५ कोटी २ लाख ३५ हजार ८८२ किमी दूर तर चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ९१ हजार ४८२ किमी दूर असेल.

या काळात चंद्र पृथ्वीच्या आणखी जवळ असता तर खग्रास ग्रहण दिसले असते. पण चंद्र दूर असल्याने त्याची सावली पूर्ण सूर्य झाकू शकणार नाही त्यामुळे सूर्याच्या मध्ये चंद्राची काळी सावली आणि भोवतीने प्रकाशमय वलय दिसेल. आणखी एक विशेष म्हणजे या दिवशी सूर्याची कर्कवृत्तावर पडणारी किरणे सरळ रेषेत पडतील. हा दिवस उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आणि सर्वात छोटी रात्र असणारा दिवस आहे. ग्रहणाच्या शेवटच्या भागात डायमंड रिंग दिसेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment