चायनाचे वर्चस्व मोडून स्मार्टफोन निर्यातीत अग्रणी होणार भारत  - Majha Paper

चायनाचे वर्चस्व मोडून स्मार्टफोन निर्यातीत अग्रणी होणार भारत 

फोटो साभार जागरण

एके काळी मेड इन चायना स्मार्टफोनचे वर्चस्व भारतीय बाजारपेठेत होते मात्र आता परिस्थिती वेगळ्या वळणावर असून जगभर मेड इन इंडिया स्मार्टफोन पोहोचू लागले आहेत. इंडिया सेल्युअर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत मेड इन इंडिया मोबाईल्सची निर्यात १०० अब्ज डॉलर्सवर जाईल. तर मोबाईलच्या पार्टसची निर्यात ४० अब्ज डॉलर्सची पातळी गाठेल.

एक वेळ अशी होती की चीन आणि व्हिएतनाम जगातील १९८ देशांना फोन निर्यात करत होते आता त्या स्पर्धेत भारत उतरला असून सध्या आपली निर्यात ३ अब्ज डॉलर्सवर असून आपण तीन नंबरवर आहोत. मात्र लवकरच भारत या निर्यातील दुसऱ्या स्थानावर जाईल आणि २०२५ मध्ये चीनलाही मागे टाकून अव्वल बनेल.

इंडिया सेल्युअर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोहिन्द्रो म्हणाले आजपर्यंत भारतात निर्यातीचे प्रमाण आयतीपेक्षा नेहमीचा कमी राहिले आहे. मात्र २०१९-२० मध्ये ४१.५ दशलक्ष फोन निर्यात केले गेले तर ५०.६ दशलक्ष फोन आयात केले गेले. २०२० मध्ये अशी वेळ प्रथमच आली आहे की आयतीपेक्षा निर्यात अधिक होणार आहे. हे एक रेकॉर्ड असून २०१४ पर्यंत देशात फक्त दोन स्मार्टफोन उत्पादक केंद्रे होती ती संख्या २०१८ मध्येच २६८ वर गेली आहे.

Leave a Comment