आमीरच्या लालसिंग चढ्ढा मध्ये करोनाची एन्ट्री?

फोटो साभार कोईमोई

जगभरात करोनामुळे लाखो कोटींचे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असताना बॉलीवूड अभिनेता आमीर खान करोनाचा फायदा घेण्याच्या मूड मध्ये असल्याचे सांगितले जात आहे. बॉलीवूडलाईफ डॉट कॉम वरील माहितीनुसार आमीरच्या आगामी लालसिंग चढ्ढा मध्ये करोनाची एन्ट्री होणार आहे. म्हणजे या चित्रपटात करोना संकट सामील केले जाणार असून त्यावर गंभीरपणे विचार केला जात आहे.

या चित्रपटात देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून आत्तापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घटनांचा प्रवास पडद्यावर दाखविला जाणार आहे. त्यात करोना संकटाचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्यानंतरची प्रत्येक महत्वाची घटना दाखवायची असेल तर करोना शिवाय ही कहाणी पुरी होऊ शकणार नाही. करोना मुळे चित्रपटाचे शुटींग थांबले आहे. त्या दरम्यान चित्रपटात करोनाला प्रवेश देण्यासाठी मनाची तयारी केली जात आहे. त्यासाठी अर्थातच कथेत काही बदल करावे लागणार आहेत.

या चित्रपटात देशात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेली बाबरी मशीद घटना सुद्धा सामील केली गेली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment