अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर जगभरात वर्णभेद विरोधी लढा सुरू झाला आहे. वर्णभेदाविरोधात लढताना निदर्शकांनी आपली पद्धत बदलली असून, आता निदर्शक ऐतिहासिक मुर्त्या तोडत आहेत. जगभरात आतापर्यंत 45 पुतळ्यांची तोडफोड केली आहे. निदर्शकांचे म्हणणे आहे की ज्या ऐतिहासिक मुर्त्यांना तोडण्यात आले आहे ते सर्व गुलामी आणि दास प्रथाला प्रोत्साहन देत असे. सोबत वर्णभेदाचे समर्थन करत असे.
इतिहासावर पोहचली वर्णभेदाची लढाई, अमेरिकेपासून ते युरोपर्यंत पाडल्या जात आहेत मुर्त्या
सर्वाधिक नुकसान अमेरिका आणि ब्रिटनमधील पुतळ्यांचे झाले आहे. बोस्टनचे महान खलाशी खिस्टोफर कोलंबसच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. निदर्शकांचे म्हणणे आहे की कोलंबसने मूळ अमेरिकन नागरिकांची सामूहिक हत्या केली होती. ब्रिटनमध्ये निदर्शन करणाऱ्यांनी राणी विक्टोरियाच्या प्रतिमेला देखील घराब केले आहे. त्यांचावर वसाहतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे.
ब्रिटनमध्ये वर्णभेदाविरोधात निदर्शन करणाऱ्यांनी अशा 60 मुर्त्यांची यादी तयार केली आहे. लीड्स येथील क्वीन विक्टोरियाच्या प्रतिमेला पेंट स्प्रेने खराब करण्यात आले आहे. ब्रिस्टल येथे एडवर्ड कोल्सटन यांच्या प्रतिमेला पाडण्यात आले. कोल्सटन आफ्रिकन लोकांची विक्री करणारा एक व्यापारी होता.
एडिनबर्ग येथे रॉबर्ट डंडासची मुर्ती देखील खराब करण्यात आली. रॉबर्ट डंडासचे वडील हेनरी डंडास देखील गुलामांसंबंधी कामाशी जोडलेले होते. बेल्झियममध्ये राजा लियोपोल्डची पुतळ्याची विटंबना करण्यात आली. लियोपोल्डला दासप्रथेला प्रोत्साहन देणारे मानले जाते. तर लंडनमध्ये रॉबर्ट मिलिगनच्या पुतळ्याची निदर्शकांनी तोडफोड केली.