‘कोरोना संकटात लोकांच्या खात्यात कोट्यावधी रुपये टाकले – अमित शाह’, प्रकाश राजने साधला निशाणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमध्ये आपल्या व्हर्च्युअल रॅलीला सुरूवात केली आहे. त्यांच्या व्हर्च्युअल रॅली संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ते सांगत आहेत की पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या काळात 51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यावधी रुपये पाठवले. हे सांगत असताना अमित शाह अडखळतात व त्यांना रक्कमेचा व्यवस्थित उल्लेख करता येत नाही. या व्हिडीओवरून अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट करत अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रकाश राज यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, किती लाजीरवाणी गोष्ट आहे. खोटे देखील व्यवस्थित बोलता येत नाही. प्रकाश राज यांचे हे ट्विट व्हायरल होत असून, नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, अमित शाह व्हर्च्युअल रॅलीद्वारे विरोधकांवर निशाणा साधत आहेत. 75 व्हर्च्युअल रॅलींद्वारे जनतेशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे अभिनंदन देखील त्यांनी केले.

Leave a Comment