लोकलसाठी वोकल होणे गरजेचे, उद्योग जगताला पंतप्रधान मोदींचा मंत्र

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (आयसीसी) कोलकत्ता येथील विशेष कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले की, आयसीसी 95 वर्षांपासून देशाची सेवा करत आहे. आजच्या काळात देशाला आत्मनिर्भर होणे गरजेचे असून, दुसऱ्या देशावरील निर्भरता कमी करायला हवी.

मोदी म्हणाले की, आज आपल्याला वस्तू विदेशातून मागवाव्या लागतात. आपल्याला विचार करायला हवा की त्या वस्तू देशात कशा बनतील व आपण निर्यात कसे करू. हीच वेळ आहे की लोकलसाठी वोकल व्हावे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. आता कंपन्या थेट पीएमओपर्यंत सामान अथवा आपली योजना पोहचवू शकतात. लोकांनी जीईएममध्ये सहभागी व्हावे. जेणेकरून देशी कंपन्यांचे सामान सरकार खरेदी करेल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 5 वर्षांनी आयसीसी 100 वर्ष पुर्ण करेल. 2022 मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होणार आहेत. अशा स्थितीमध्ये हीच वेळ मोठा संकल्प करण्याची आहे. स्थापनेपासून आयसीसीने आतापर्यंत खूप काही बघितले आहे व भारताच्या विकास प्रवासाचा एक भाग आहे. आज देश कोरोना व्हायरस, टोळधाड, आग, भुकंप, चक्रीवादळाचा सामना करत आहे. वेळ आपली परिक्षा घेत आहे. या समस्येचा उपचार केवळ मजबूती आहे. कठीण काळात भारत नेहमीच पुढे आला आहे.

Leave a Comment