कोरोनावरील औषध शोधल्याचा पतंजलीचा दावा, हजारो रुग्ण बरे झाले – बालकृष्ण

कोरोना व्हायरसवरील औषध शोधण्यासाठी भारतासह जगभरातील देशात काम सुरू आहे. व्हायरसवरील लस उपलब्ध होण्यासाठी 1 वर्ष लागू शकतात असे सांगितले जात आहे. मात्र आता पतंजलीचे सह-संस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी दावा केला आहे की पतंजलीने कोरोनावरील औषधाची निर्मिती केली आहे. त्यांच्या औषधामुळे 1 हजारांपेक्षा अधिक लोक बरे झाल्याचेही त्यांनी सांगितले.

आचार्य बालकृष्ण यांनी दावा केला आहे की, वेगवेगळ्या ठिकाणांवरील अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना हे औषध देण्यात आले. ज्यातील 80 टक्के रुग्ण बरे झाले. कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात पसरण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांच्या संस्थेतील प्रत्येक विभागाला कोरोनावरील उपचारसाठी उपयोगी औषधावर काम करम्यास सांगितले. ज्याचा परिणाम आता समोर आला आहे. या औषधाचे केवळ यशस्वी परिक्षणच नाही तर याची निर्मिती देखील केली आहे.

त्यांनी सांगितले की, शास्त्र, वेद वाचून व त्याला विज्ञानाच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून आयुर्वेदिक गोष्टींपासून हे औषध तयार केले आहे. या औषधासाठी पंतजलीच्या शेकडो वैज्ञानिकांनी दिवस-रात्र काम केले.

पतंजली शोध संस्थेचे मुख्य वैज्ञानिकांनी सांगितले की, जानेवारीमध्ये जेव्हा चीनमध्ये कोरोनाची सुरुवात झाली तेव्हाच या दिशेने काम सुरू केले होते. दिवस-रात्र शेकडो वैज्ञानिकांनी मेहनत केली. या मेहनतीमुळेच औषध बनवण्यात यश मिळाले.

Leave a Comment