50 लाखांच्या देवाण-घेवाणविषयीची ज्योतिरादित्य सिंधिया यांची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल

मध्य प्रदेशमध्ये एका ऑडिओ क्लिपमुळे राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिहं चौहान यांच्यानंतर भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. व्हायरल ऑडिओमध्ये ते तिकिटासाठी 50 लाख रुपयाच्या देवाण-घेवाणविषयी बोलत आहेत. ही क्लिप विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसची असल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले असून, माझा पेपर या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत पुष्टी करत नाही.

कथित ऑडिओमध्ये अनिता जैन नावाच्या महिलेला निवडणुकीची उमेदवारी देण्याविषयी चर्चा होती. मात्र अशोक नगरमधून तिकिट मिळाले नाही. महिला या ऑडिओमध्ये अग्रवाल नावाच्या व्यक्तीला 50 लाख रुपये देण्याचे सांगत आहे. ऑडिओच्या सुरुवातीला महिला ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रणाम करते. यानंतर सिंधिया म्हणातात की, सॉरी अनिता यावेळी मी काहीही करू शकत नाही.

तिकिटाची दावेदार अनिता म्हणत आहे की, महाराज सर्व समाजाचे लोक माझ्या बाजूने आहेत. अशोकनगरची सीट काँग्रेसकडे जात आहे असे पहिल्यांदा होत आहे. मी पुर्ण तयारी केली आहे. दुसरा उमेदवार जिंकणार नाही, त्याला मोठा विरोध होत आहे, असेही सांगत आहे. अनिताला आश्वासन देताना सिंधिया म्हणत आहेत की चिंता करू नका. यावेळी आपलेच सरकार बनणार आहे. तुम्हाला पुर्ण न्याय आणि सन्मान मिळवून देईल. यानंतर अनिता जज्जी नावाच्या व्यक्तीचे नाव घेत तो प्रत्येक निवडणुकीत हत्या करतो असे सांगत आहे.

या व्हायरल ऑडिओमुळे मध्य प्रदेशमध्ये राजकारण सुरू झाले सिंधिया समर्थकांनी ऑडिओ बनावट असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे अनिता जैन यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की माझे नाव सर्वेक्षणामध्ये होते. तिकिट न मिळाल्याने सिंधिया यांना फोन केला होता. बोलत असताना तेथे अनेक लोक होते. बोलताना रडू आले व मी फोन तेथेच फेकून निघून गेले. त्यावेळी तेथील लोकांनी फोनमधून ऑडिओ काढून पीसीसीमध्ये पाठवला. पैसे मला परत मिळाले होते.

Leave a Comment