खुशखबर : कोरोनावरील लस बनवली, सप्टेंबरपासून मानवी ट्रायल, जॉन्सन अँड जॉन्सनने केला दावा

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील उपचार, लस शोधण्यासाठी वैज्ञानिक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. यातच आता जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने दावा केला आहे की त्यांना कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी संभाव्य लस शोधली असून, सप्टेंबर महिन्यापासून याचे मानवी ट्रायल सुरू होईल. कंपनीचे म्हणणे आहे की ही लस पुढील वर्षीच्या सुरूवातीला इमर्जेंसी वापरासाठी उपलब्ध देखील होईल.

Image Credited – Deccan Herald

कंपनीने सांगितले की, त्यांनी अमेरिकन सरकारच्या बायोमेडिकल एडवांस्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीसोबत करार केला आहे. ते या लसीसाठी 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनने जानेवारी महिन्यातच एडी26 सार्स सीओव्ही-2 वर काम करण्यास सुरूवात केली होती. या लसीसाठी इबोलाच्या संभाव्य लसीसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचाच वापर केला जाणार आहे.

Image Credited – The Indian Express

कंपनीचे मुख्य वैज्ञानिक पॉल स्टोफेल्स म्हणाले की, आमच्याकडे अनेक संभाव्य लसी होत्या ज्यांचे परिक्षण आम्ही प्राण्यांवर केले. यातील सर्वोत्तम लस निवडायची होती ज्यात 12 आठवडे गेले. आजपर्यंत कोरोना व्हायरस संबंधित इतर व्हायरसवर यशस्वी मानवी लस बनलेली नाही. मात्र स्टोफेल्स यांना विश्वास आहे की त्यांना यात मिळेल.

Leave a Comment