कैदी झाले कोरोना वॉरिअर्स, जेलमध्ये बनवत आहेत पीपीई किट - Majha Paper

कैदी झाले कोरोना वॉरिअर्स, जेलमध्ये बनवत आहेत पीपीई किट

गंभीर गुन्ह्यासाठी कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी आता दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करत आहेत. बिहारच्या मोतिहारी सेंट्रल जेलमधील कैदी आता कोरोना वॉरिअर्स बनले आहेत. त्यांना पोलिसांनी 50 किट बनवण्याची ऑर्डर दिली आहे. कारागृह प्रशासनाने कैद्यांद्वारे बनवण्यात आलेले 32 पीपीई किट पोलिसांना सोपवली आहे. खूप कमी खर्चात हे किट बनवण्यात आले आहेत. सोबतच कैदी मास्क आणि हातमोजे देखील बनवत आहेत.

कारागृहात हत्या सारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले कैदी पीपीई किट बनवत आहेत. कोरोना संकट सुरू झाल्यापासूनच हे कैदी मास्क बनवत आहेत. आता या कैद्यांना पीपीई किट बनवण्याचे काम देखील दिले आहे. या कैद्यांसाठी विशेष प्लास्टिक उपलब्ध करून पीपीई सप्लायची ऑर्डर दिली आहे.

या पीपीई किटची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही. एसपी नवीन झा यांनी सांगितले की, कैदी आधीपासूनच मास्क आणि मोजे बनवत होते. ज्याचा पुरवठा पोलिसांना करण्यात आला होता. आता कैद्यांनी पीपीई किट बनवण्यास सुरूवात केली आहे.

Leave a Comment