रिकाम्या स्टेडियममध्ये होऊ शकते आयपीएल, गांगुलीने दिले संकेत

कोरोना व्हायरसमुळे यंदाचे आयपीएल सत्र अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल भरवण्याचे संकेत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहेत. गांगुलीने सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलेले आयपीएलच्या आयोजनासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे.

गांगुलीने आयसीसी बोर्डाच्या बैठकीनंतर राज्य संघांना पत्र पाठवले आहे. यावरून लक्षात येते बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनाबाबत उत्सुक आहे. गांगुलीने सांगितले की, बीसीसीआय या वर्षी आयपीएलचे आयोजनासाठी सर्व पर्यायांचा विचार करत आहे. ज्यात रिकाम्या स्टेडियममध्ये सामने भरवण्याचा देखील पर्याय आहे. प्रेक्षक, फ्रेंचाईजी, खेळाडू, प्रायोजक व सर्वच जण या वर्षी आयपीएलच्या आयोजनाबाबत उत्सुक आहेत.

गांगुलीनुसार, अन्य देशांचे खेळाडू देखील आयपीएलमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत. बीसीसीआय लवकरच या संदर्भात निर्णय घेईल. यासोबत घरगुती क्रिकेट स्पर्धा जसे की रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी आणि विजय हजारे सारख्या स्पर्धांसाठी योजना बनवण्याचे काम सुरू आहे.

जर टी20 विश्वचषकाचे निर्धारित तारखेला आयोजन करण्यात आले नाही तर त्या ऐवजी आयपीएल होऊ शकते. आयसीसीने विश्वचषकाचा निर्णय पुढील महिन्यापर्यंत टाळला आहे.

Leave a Comment