चीनच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही

ऑस्ट्रेलियाने कोरोना व्हायरस महामारीचा तपास करण्याची मागणी केल्यानंतर आता चीनने त्यांच्या विरोधात व्यापाराला शस्त्र बनवण्याची तयारी केली आहे. चीनच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यात चीनने ऑस्ट्रेलियाला आर्थिक नुकसान पोहचवण्याच्या हेतुने अनेक पावले उचलली आहेत.

Image Credited – Aajtak

ऑस्ट्रेलियाने जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक बैठकीत महामारीचा तपास करण्याच्या बाजूने मतदान केले होते. तेव्हापासून नाराज झालेल्या चीनने ऑस्ट्रेलियाला वारंवार धमकी देण्यास सुरूवात केली आहे. चीनच्या शिक्षण मंत्रालयाने म्हटले की, ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा याचा विचार करावा. ऑस्ट्रेलियाची आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रणाली त्यांचे चौथे सर्वात मोठे निर्यात आहे. विदेशी विद्यार्थ्यांकडून ऑस्ट्रेलियाला वर्षाला 26 अब्ज डॉलरची कमाई होते.

Image Credited – TFIPOST

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन एका रेडिओ स्टेशनशी बोलताना म्हणाले की, ऑस्ट्रेलिया मुक्त बाजारपेठेचे समर्थन करतो. मात्र धमकी कोठूनही आली तरीही आम्ही त्याच्यासाठी स्वतःची मूल्य गहाण ठेवणार नाही. चीनने काही दिवसांपुर्वीच ऑस्ट्रेलियातील बीफच्या आयातवर बंदी घातली आहे. चीनने आपल्या पर्यटकांना देखील चीनला जाणे टाळावे असे सांगितले आहे. चीनच्या अधिकाऱ्यांनी यामागे कारण दिले की महामारी दरम्यान ऑस्ट्रेलियात आशियाई लोकांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यांचा देश विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

मॉरिसन म्हणाले की, ऑस्ट्रेलिया जगात सर्वोत्तम शिक्षा आणि पर्यटनच्या संधी उपलब्ध करतो. चीनी नागरिकांनी ऑस्ट्रेलियाला निवडणे हा पुर्णपणे त्यांचा निर्णय आहे. मला माझ्या देशातील शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राच्या उत्कृष्टतेवर विश्वास आहे. दरम्यान, चीन ऑस्ट्रेलियाचा मोठा व्यापारी भागीदार आहे. दोघांमध्ये दरवर्षी 235 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरचा व्यापार होतो. चीनसोबत व्यापार संबंध बिघडल्यास ऑस्ट्रेलियाला मोठे नुकसान होऊ शकते.

Leave a Comment