95 लाखांची शानदार ‘बीएमडब्ल्यू एक्स6’ लग्झरी एसयूव्ही भारतात लाँच

बीएमडब्ल्यूने आपली नवीन लग्झरी एसयूव्ही बीएमडब्ल्यू एक्स6 कूप थर्ड जनरेशन भारतात लाँच केली आहे. ही एसयूव्ही एक्सलाइन आणि एम स्पोर्ट या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलेले आहे. कंपनीने या दोन्ही व्हेरिएंट्सची एक्सशोरूम किंमत 95 लाख रुपये ठेवली आहे व दोन्हीमध्ये टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळेल. कारची अंडरपिनिंग्स बीएमडब्ल्यू एक्स5 एसयूव्हीद्वारे घेण्यात आली आहे.

Image Credited – NDTV

कारच्या पुढील भागात ब्रँडची सिग्नेचर स्टाईल मोठी किडनी ग्रिलसोबत इलुमिनेटिंग फंक्शन देण्यात आले आहे. ज्याच्या आजुबाजूला ट्विन पॉड एलईडी हेडलाईड्स आहे. कंपनीने कारमध्ये बीएमडब्ल्यू लेझरलाइनसोबत अडेप्टिव्ह एलईडी हेडलाईट्स देखील दिले आहेत. कारच्या एकूण डिझाईनमध्ये चांगल्या डिझाईनचे टेललाईट, पॅनी शोल्डर क्रीज, एल-शेप एलईडी हेडलाईट्स आणि एम स्पोर्ट एग्ज्हॉस्ट सिस्टम देण्यात आले आहे. याशिवाय एक्स6 एसयूव्हीच्या स्पोर्ट व्हेरिएंटमध्ये ब्लॅक ग्रिल आणि ब्लॅक एलॉय व्हिल्स देण्यात आलेले आहेत. आरामदायी प्रवास आणि हँडलिंगसाठी कारमध्ये अडेप्टिव्ह एअर सस्पेंशन मिळेल.

Image Credited – NDTV

फीचर्सबद्दल सांगायचे तर नवीन बीएमडब्ल्यू एक्स6 सोबत वर्नास्का लेदर अपहोस्ट्री देण्यात आली आहे. याशिवाय दोन 12.3-इंचचे डिस्प्ले, फोर-झोनन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सनरूफ, मल्टीफंक्शनल सीट्ससोबत मसाज फंक्शन, ग्लास फिनिशचे गियर लिव्हर, बोवर्स अँड वाइकिन्स 3डी साउंड सिस्टमसोबत 20 स्पीकर्स, अँबिएंट एअर पॅकेज आणि अनेर हाईटेक फीचर्स कारमध्ये देण्यात आलेले आहेत. एसयूव्हीच्या एम स्पोर्ट व्हेरिएंटमध्ये एम स्पोर्ट ब्रेक्स, एग्जॉहस्ट, अडेप्टिव एम सस्पेंशन, एम एयरोडायनामिक्स पॅकेज आणि 20-इंच एअलॉय व्हिल्स देण्यात आलेले आहेत.

Image Credited – Moneycontrol

भारतीय बाजारात एसयूव्हीला 3.0 लीटर, 6 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हे इंजिन 335 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत 8 स्पीड स्टेपट्रॉनिक गियरबॉक्स मिळेल. यात एक्स ड्राईव्ह फोर-व्हिल ड्राईव्ह सिस्टम देखील आहे. एसयूव्ही केवळ 5.5 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते.

Leave a Comment