या डिझायनरने डिझाईन केला हास्य दाखविणारा मास्क

फोटो साभार नॉट सो कॉमन

गेम डिझायनर, प्रोग्रॅमर टेलर ग्लेअर याने एक खास मास्क तयार केला असून हा मास्क लावलेली व्यक्ती हसते आहे का बोलते आहे हे बाहेरून समजणार आहे. मास्क लावलेल्या व्यक्तीचे हास्य आणि बोलणे  एलईडी लाईट मुळे समजू शकणार आहे. मास्क लावलेली व्यक्ती बोलत असेल तर एलईडी लाईट्स ठराविक पद्धतीने चमकतील व हसत असेल तर बाहेरून स्माईली सिम्बॉल दिसेल.

टेलर याच्या म्हणण्यानुसार करोनाचा धोका अजून कायम असल्याने मास्क लावल्याशिवाय बाहेर पडणे शक्य नाही. मास्क असेल तर संबंधित व्यक्ती काही बोलत असेल किंवा हसत असेल तर बाहेरून कळत नाही. ही अडचण लक्षात आल्यावर या मास्कची कल्पना सुचली. हा मास्क कापडी आहे आणि तो बनवायला १ महिना लागला.

टेलर सांगतो, कापडी मास्क मध्ये व्हॉईस पॅनल बसवून ते एलईडीशी जोडले गेले आहे. त्यात १६ एलईडी लाईट बसविले गेले आहेत. माणूस बोलत असले तर हे लाईट पेटतील त्यामुळे समोरच्या माणसाला हा माणूस काही सांगू पाहतोय हे समजेल आणि नुसताच हसला तर स्मायलीवरून समजू शकेल. हा मास्क बनविण्यासाठी ३८०० रुपये खर्च आला आहे.

टेलरच्या म्हणण्यानुसार एलईडी पॅनल बाजूला करून हा कॉटन मास्क धुता येणार आहे. तसेच बाकी वस्तू म्हणजे व्होईस पॅनल, दिवे, बॅटरी वेळोवेळी युव्ही लँपने सॅनीटाइज करता येणार आहे. या मास्कच्या एका बाजूला ९ वॉटची बॅटरी बसविली गेली आहे. टेलरने या प्रकारचा मास्क स्वतःला वापरण्यासाठी बनविला पण अजून विक्रीसाठी मास्क बनवायचे का याचा निर्णय त्याने घेतलेला नाही.

Leave a Comment