अमूलने हळद दुधापाठोपाठ सादर केले आले आणि तुळस दुध

फोटो साभार इंडीयन को ऑपरेटिव्ह

देशात थैमान घातलेल्या करोनापासून बचावासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा एका चांगला पर्याय असल्याने अमूलने बुधवारी दोन खास उत्पादने बाजारात आणली आहेत. हळद घातलेले दुध सादर केल्यावर आता रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे आले दुध आणि तुळसयुक्त दुध अमूलने बाजारात आणले आहे. आयुष् मंत्रालयाने जारी केल्या मार्गदर्शक तत्वांनुसार एप्रिल मध्येच अमूलने हळदयुक्त दुध बाजारात आणले होते. रोगाशी लढण्याची शक्ती वाढविण्यासाठी हळद दुध पिण्याची प्रथा भारतात फार जुनी आहे.

अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी म्हणाले ग्राहकांकडून हळद दुधाला चांगली मागणी आल्यामुळे आता आम्ही आलेयुक्त आणि तुळसयुक्त दुध सादर करत आहोत. हे एकप्रकारचे आयुर्वेदिक पेय असून सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे. ही उत्पादने कॅन आणि पॅकेट अश्या प्रकारात उपलब्ध आहेत. १२५ मिलीग्राम कॅन २५ रुपयांना मिळेल.

येत्या काही दिवसात रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी आणखी काही उत्पादने बाजारात आणली जाणार असून त्यात अश्वगंधा आणि मधयुक्त दुधाचा समावेश आहे असेही सोधी यांनी सांगितले. आयुष मंत्रालयाने करोना विरुध्दच्या लढाईत रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत त्यात हळदयुक्त दुधाचा समावेश आहे. हळद किती प्रमाणात घालायची आणि एक दिवसात हे दुध किती वेळा घ्यायचे याचे मार्गदर्शनही आयुष् मंत्रालयाने केले आहे. हळद घातलेल्या दुधाला हल्दीलाटे असेही म्हटले जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment