अरेच्चा! माकड चक्क स्वतःच उपचारासाठी पोहचले हॉस्पिटलमध्ये

माकडाच्या हुशारीचे कारनामे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. माकडाच्या समजूतदारपणाचा असाच एक प्रकार कर्नाटकच्या दांडेली येथे समोर आला आहे. येथे एक जखमी माकड चक्क स्वतःच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयएफएस अधिकारी संदीप त्रिपाठी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. जखमी माकड उपचारासाठी दांडेली येथील पाटील हॉस्पिटलमध्ये आले. कर्मचाऱ्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की माकड उपचारासाठी हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर बसले आहे. माकड कोणालाही नुकसान न पोहचवता येणाऱ्या जाणाऱ्याला बघत आहे. यानंतर हॉस्पिटलचा कर्मचारी त्याच्या जवळ येतो व त्याच्यावर उपचार करतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक जणांनी बघितला आहे. अनेक युजर्सनी कमेंट्स करत माकडाची हुशारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

Leave a Comment