अमेरिकेच्या पश्चिम व्हर्जिनिया येथील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील दोन व्यक्तींचे म्हणणे आहे की 80 वर्षांपुर्वी हॉस्पिटलमध्ये त्यांची अदलाबदली झाली होती. याबाबत ते एका रोमन कॅथोलिक डियोसविरोधात न्यायालयीन खटला दाखल करणार आहेत. दोन्ही व्यक्तींनी हॉस्पिटलवर बेजबाबदारपणा आणि कर्तव्य पुर्ण न करण्याचा आरोप केला आहे.
80 वर्षांपुर्वी हॉस्पिटलमध्ये झाली होती मुलांची अदलाबदली, आता न्यायालयात दाखल केला खटला
जॉन विलियन कैर III आणि जॅकी ली स्पेंसर यांचा जन्म 29 ऑगस्ट 1942 ला बखानोन येथील सेंट जोसेफ हॉस्पिटलमध्ये झाला होता. त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात म्हटले आहे की हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना चुकीच्या कुटुंबाकडे पाठवले. मागील वर्षी डीएनए टेस्टमध्ये याचा खुलासा झाला. या चुकीमुळे त्यांनी आयुष्यभर वाईट गोष्टींचा सामना करावा लागला व त्यांनी नुकसानीची मागणी केली आहे. या संदर्भात डियोसने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
खटल्यात म्हटले आहे की, स्पेंसर यांनी आपल्या जन्म प्रमाणपत्रावर असलेल्या वडिलांच्या शोधासाठी 50 वर्ष घालवले. त्यांना सांगण्यात आले होते की त्याच्या जन्माआधीच त्याचा वडिलांनी आईला सोडले होते. डीएनएमध्ये ते त्यांचे खरे नातेवाईक नसून कैरच्या कुटुंबाशी संबंध असल्याचे समोर आले. दोघांचाही जन्म त्याच हॉस्पिटलमध्ये त्याच दिवशी झाल्याची माहिती पुढे समोर आली.