हा गरीब देश देखील झाला कोरोनामुक्त, संपुर्ण जग हैराण

काही दिवसांपुर्वी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. आता न्यूझीलंड पाठोपाठ टांझानियाचे राष्ट्रपती जॉन मागुफुली यांनी देखील देश कोरोना व्हायरस मुक्त झाल्याची घोषणा केली आहे. असे केवळ देवाच्या आशिर्वादामुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले. मात्र सोबतच त्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्यांनी देश कोरोनामुक्त होण्याचे श्रेय स्थानिक आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि प्रार्थना करणाऱ्या नागरिकांना दिले आहे.

Image Credited – Aajtak

मागुफुलीने मास्कपासून मुक्ती मिळण्याचे सेलिब्रेशन देखील केले. ते म्हणाले की, हा एक मोठा संकेत आहे की देश आता महामारीतून बाहेर पडला आहे आणि लोकांमध्ये याची भिती देखील कमी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, टांझानियाने 29 एप्रिलपासून आतापर्यंत आतापर्यंक कोरोनावर कोणताही डेटा जारी केलेला नाही. अखेरची मोजणी केली त्यावेळी तेथे 509 कोरोनाग्रस्त होते. ज्यातील 21 जणांचा मृत्यू झाला होता. या देशाची बहुतांश लोकसंख्या गरीबी रेषेच्या खाली आहे.

Image Credited – Aajtak

डब्ल्यूएचओच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टेंसिंगचे उल्लंघन आणि धार्मिक स्थळे सुरू ठेवण्याबाबत देखील चिंता व्यक्त केली होती. राष्ट्रपती मागुफुली यांना सुरूवातीपासूनच कोरोना व्हायरसच्या संसर्गाची चिंता नव्हती. त्यांना नागरिकांना व्हायरसपासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. ज्यामुळे शरीरातील राक्षसी व्हायरस टिकणार नाही.

Image Credited – Aajtak

टांझानियाने आता यूनिव्हर्सिटी, हाय स्कूल आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक पुन्हा सुरू केली आहे. मात्र प्रायमेरी-सेकेंडरी स्कूल अद्याप बंद आहेत.

Leave a Comment