‘चीनी आपल्या सीमेत घुसले असताना पंतप्रधान गप्प आहेत’, राहुल गांधींनी सरकारवर साधला निशाणा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून लद्दाखच्या लाइन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोलवर (एलएसी) चीनच्या वाढत्या हालचालीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी सरकारला स्थिती स्पष्ट करण्यास आणि चीनी सैनिक भारतीय सैन्यात घुसले आहेत की नाही याची माहिती देण्यास सांगत आहेत.

आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत दावा केला की, चीनी सैन्य भारतीय सीमेत घुसले आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर गप्प आहेत व कोठे दिसत नाहीत.

याआधी देखील राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर टीका करत शायरीच्या अंदाजात सीमेवरील परिस्थिती सर्वांना माहिती असल्याचे म्हटले होते. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींना शायरीद्वारे उत्तर दिले होते.

राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर निवृत्त लेफ्टिनेंट जनरल आरएन सिंह म्हणाले की, सरकार काय करत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित करू नये. कारण या गोष्टी गुप्त असतात व याची माहिती दिली जात नाही. दरम्यान, भारत-चीन सैन्याने शांतीपुर्णरित्या समस्या सोडवण्यासाठी पुर्व लडाख भागातील आपले सैन्य परत बोलवले आहे. दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल स्तरावर या संदर्भात चर्चा होणार आहे. 5 मे ला दोन्ही देशाचे सैनिक पेगोंग त्सो भागात भिडले होते.

Leave a Comment