भारतामुळे नेपाळमध्ये पसरत आहे कोरोना, पंतप्रधान ओली यांचा आरोप

भारतासोबतच्या सीमावादाबरोबरच आता नेपाळने कोरोना व्हायरसवरून भारतावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओला म्हणाले की, नेपाळमधील 85 टक्के कोरोनाची प्रकरण भारतातून आले आहेत. याआधी देखील ओला यांनी नेपाळला इटली अथवा चीन नाहीतर भारतातून येणाऱ्या लोकांमुळे व्हायरसचा धोका आहे असे म्हटले होते. नेपाळमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 हजारांच्या पुढे गेला आहे.

नेपाळच्या संसदेने देशाच्या नवीन नकाशाला मंजूरी दिली आहे. ज्यात लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरासह भारताच्या 395 किमी भागाला आपले क्षेत्र दाखवले आहे. संविधान संशोधन विधेयकावर चर्चेसाठी याला नेपाळच्या संसदेत सादर करण्यात आले होते. नेपाळने हे विधेयक मंजूरीसाठी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवले आहे. त्यांनी सही करताच नकाशाला कायद्याचे स्वरूप येईल.

कोरोना व्हायरसबाबत देशाला संबोधित करताना केपी शर्मा म्हणाले की, नेपाळमध्ये इतर देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी आहे. भारतातून बेकायदेशीररित्या लोक नेपाळमध्ये येत असून, यामुळे कोरोना पसरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Leave a Comment