सोशल डिस्टेंसिंग आणि नियमांचे पालन करा, नाहीतर पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागेल – उद्धव ठाकरे

प्रयत्न करून देखील महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांचे पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागेल असे म्हटले आहे. सध्या अनलॉक 1 अंतर्गत नियम शिथिल करण्यात आले असून, 2 महिन्यानंतर दुकानांपासून उद्योग-धंदे पुन्हा सुरू होत आहेत.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 90 हजारांच्या पुढे गेला आहे. यातील सर्वाधिक प्रकरण मुंबईत आहेत. पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला आता कोरोना व्हायरससोबत जगायला हवे. हेच कारण आहे की आर्थिक कार्य सुरू करण्यासाठी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.

ते म्हणाले की, कोरोनाचा धोका अद्याप गेलेला नाही. अशातच जर हे असेच सुरू राहिल्यास लॉकडाऊन अजून वाढवले जावू शकते. तुमच्यासाठीच सूट देण्यात आलेली आहे कृपया याला वाया घालवू नका. लॉकडाऊन वाढवला जावू शकतो, मात्र मला खात्री आहे की लोक सरकारच्या नियमांचे पालन करतील.

Leave a Comment