पाकिस्तानातील हिंदूंची घरे पाडण्याबाबत भारताने घेतला तीव्र आक्षेप

भारताने पाकिस्तानच्या उच्च आयुक्ताला कठोर शब्दात एक पत्र पाठवले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अल्पसंख्यांक हिंदू समुदायाच्या घरांना निशाणा बनवून पाडले जात आहे. या विषयी आक्षेप घेणारे पत्र भारताने पाकिस्तानच्या उच्चयुक्ताला पाठवले आहे. या संदर्भात अमर उजालाने वृत्त दिले आहे.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की भारताने आक्षेप घेणाऱ्या पत्रात पाकिस्तानात धार्मिक आणि जातीय अल्पसंख्याकांना निशाणा बनवून त्यांचे उत्पीडन केले जात असल्याची चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चाक 52/डीबी, यजमान येथील हिंदूंच्या घरांना पाडले जात आहे. भारताने पाकिस्तानी उच्चयुक्तला या संदर्भात पाकिस्तानातील संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे व चुक सुधारण्यास सांगितले आहे. पाकिस्तान सरकारने त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना यावर सुधारात्मक कारवाई करण्यास सांगावे असे भारताने म्हटले आहे.

दरम्यान, या आधी देखील पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने तेथील पंजाबमधील हिंदूंची घरे पाडण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते.

Leave a Comment