पृष्ठभागावर कितीवेळ राहू शकतो कोरोना ? धक्कादायक माहिती आली समोर

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग मनुष्यापासून  दुसऱ्या मनुष्याला होता हे तर सर्वांनाच माहिती आहे. कोरोनाग्रस्तांच्या शिंकल्याने, खोकल्याने अथवा बोलल्याने नाक किंवा तोंडातून बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्सद्वारे संसर्ग पसरतो. हे ड्रॉपलेट्स प्लास्टिक, मेटल अथवा अन्य ठिकाणी पडले असतील तर त्याद्वारे देखील संसर्ग पसरण्याची शक्यता असते. व्हायरस एखाद्या पृष्ठभागावर किती वेळ राहतो, या संदर्भात ब्रिटनच्या लंडन कॉलेज यूनिव्हर्सिटीने संशोधन केले असून, यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Image Credited – deccanherald

जर्नल ऑफ हॉस्पिटल इंफेक्शनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, कोरोना व्हायरस कोणत्याही पृष्ठभागावर 5 दिवस जिंवत राहू शकतो व 10 तासात मोठ्या क्षेत्रात पसरू शकतो. 5व्या दिवशी याचा संसर्ग कमी होतो. या अभ्यासात संशोधकांनी ब्रिटनच्या ग्रेड ओरमंड स्ट्रीट हॉस्पिटलच्या बेड रेलिंगवर संसर्ग सोडला होता. 10 तासांनी याचा अभ्यास केल्यानंतर हा संसर्ग संपुर्ण वॉर्डमध्ये पसरला होता.

Image Credited – CNN

संशोधकांनी प्रयोग करण्यासाठी एका रुग्णाच्या श्वासातून घेतलेल्या व्हायरसचा कृत्रिमरित्या झाडांना संक्रमित करणाऱ्या व्हायरससोबत वापर केला. या दोन्ही व्हायरसला पाण्याच्या थेंबात मिसळून बेडच्या रेलिंगवर सोडले. त्यानंतर हॉस्पिटलच्या 50 नमुन्यांमध्ये हा व्हायरस आढळला. संशोधकांनी 5 दिवसात वॉर्डच्या 44 ठिकाणांवरील शेकडो नमुने घेतले. 10 तासानंतर घेतलेल्या नमुन्यात व्हायरस दरवाजाचा हँडल, खुर्ची, वेटिंग रूम, पुस्तके, मुलांची खेळणी येथे पोहचला होता. तीन दिवसांनी संसर्ग 41 टक्क्यांवरून 59 टक्के भागात पसरला.

Image Credited – medscape

हॉस्पिटलमधील कर्मचारी, रुग्ण व इतरांद्वारे व्हायरस सर्वत्र पसरला. तिसऱ्या दिवशी देखील 86 टक्के नमुन्यांमध्ये हा व्हायरस आढळला. मात्र 5व्या दिवशी संसर्ग कमी झाल्याचे दिसले. या अभ्यासाच्या संशोधक डॉ. लीना सिरिक म्हणाल्या की, या अभ्यासाद्वारे स्पष्ट होते की पृष्ठभागाद्वारे व्हायरस पसरतो. व्हायरस असलेल्या पृष्ठभागाला स्पर्श केल्याने याचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

Leave a Comment