धक्कादायक! या हॉस्पिटलने कोरोना रुग्णाकडून वसूल केले तब्बल 12 लाख रुपये

कोरोना व्हायरसच्या लढाईत एकीकडे डॉक्टरांच्या कामाचे कौतुक होत असताना, दुसरीकडे काही हॉस्पिटल रुग्णांना लुटत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. गुजरातमधील अशीच एक घटना समोर आली असून, येथे कोरोनाग्रस्त रुग्णाकडून हॉस्पिटलने तब्बल 12 लाख रुपयांपेक्षा अधिक बिल वसूल केले आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.

सुरतच्या झापा बाजार भागात राहणारे 50 वर्षीय गुलाम हैदर शेख यांना 13 मे ला सर्दी-खोकला झाला होता. कोरोना व्हायरसची लक्षण असल्याची शंका असल्याने त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर ट्राय स्टार हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले की गुलाम हैदर यांची तब्येत गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. डॉक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी केली जी पॉजिटिव्ह आली. यानंतर 48 तासांनी दुसरी चाचणी नेगेटिव्ह आली.

या दरम्यान त्यांना हॉस्पिटलच्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. कुटुंबातील लोकांना भेटण्याची परवानगी नव्हती. ते केवळ व्हिडीओ कॉलिंगवर बोलत होते. डॉक्टरांनी त्यांचे फुफ्फुस देखील खराब झाल्याचे सांगितले. 14 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर शनिवारी त्यांना सोडण्यात आले. मात्र बिलाची रक्कम बघून नातेवाईकांना धक्काच बसला. त्यांच्याकडून उपचाराचे तब्बल 12.23 लाख रुपये घेण्यात आले.

Leave a Comment