केंद्राच्या आरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्यास मनाई केल्यास हॉस्पिटलवर होणार कठोर कारवाई

संपुर्ण देश सध्या कोरोना व्हायरस महामारीचा सामना करत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे समोर आले आहे. काही हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत, तर काही जाणूनबुजून उपचार करत नाही. केंद्र सरकारने अशा हॉस्पिटल्सवर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात केंद्र सरकार आरोग्य योजनेसाठी (सीजीएचएस) निवडलेल्या हॉस्पिटल्सला सुचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, सीजीएचएससाठी निवडण्यात आलेल्या हॉस्पिटल्सला चेतावणी दिली आहे की कोरोना रुग्ण अथवा दुसऱ्या रुग्णांवर उपचार करण्यास मनाई केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल.

लोकांना उपचार मिळत नसल्याच्या घटना समोर आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. मंत्रालयाने म्हटले की या प्रकरणांची समिक्षा केली जाईल. याशिवाय राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या कोरोना हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटल्सला रुग्णांवर उपचार करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व हॉस्पिटल्स योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना उपचाराच्या सुविधा देतील. कोणतेही हॉस्पिटल रुग्णाला उपचारासाठी नकार देऊ शकत नाही व निश्चित निकषांनुसार फी घेण्यात येईल.

दरम्यान, एका अधिकाऱ्यांनुसार सीजीएचएस योजनेचे सध्या 36 लाख लाभार्थी आणि 12 लाख कार्डधारक आहेत.

Leave a Comment