फ्लिपकार्टची फ्लाईट बुकिंग सेवा सुरू, मोफत फिरण्याची संधी

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने फ्लाईट बुकिंग क्षेत्रात पाऊल ठेवले असून, आता फ्लिपकार्टच्या वेबसाईटद्वारे घरगुती आणि आंतरराष्ट्रीय विमानाचे तिकिट बुक करता येईल. कंपनीचा दावा आहे की स्वस्त तिकिट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. युजर्स www.flipkart.com/travel/flights यावर जाऊन तिकिट बुक करू शकतात.

फ्लिपकार्टच्या या साईटद्वारे तिकिट बुक केल्यास कंपनीकडून खा ऑफर देखील देण्यात येत आहे. पहिल्यांदा या पोर्टलद्वारे तिकिट बुक करताना ग्राहक FKNEW10 या कूपनचा वापर करून 10 टक्के सूट मिळवू शकतात. तर FKDOM कूपन कोडद्वारे ग्राहकांना घरगुती उड्डाणावर 2,500 रुपय सूट मिळेल. याशिवाय फ्लिपकार्ट राउंड ट्रिप बुकिंगवर RNDTRIP चा वापर करून 600 रुपये कमी करू शकता. FLYTWO कूपन कोडवर देखील 750 रुपये सूट मिळेल. याशिवाय फ्लिपकार्ट वेबसाईटवर शॉपिंग करून मिळालेल्या सुपर कॉईन्सचा वापर करून देखील तुम्ही मोफत तिकिट बुक करू शकता.

तिकिट बुक करण्यासाठी ग्राहकांना सर्वात प्रथम www.flipkart.com/travel/flights वर जावे लागेल. येथे फ्लाईट बुकिंगचा पर्याय दिसेल. वरच्या बाजूला वन वे अथवा राउंड ट्रिपचा पर्याय असेल. फ्लाईट सर्च केल्यावर अनेक कंपन्यांच्या फ्लाईट्स दिसतील. बुकिंसाठी मोबाईल नंबर अथवा ईमेल टाकू शकता. यानंतर नंबर अथवा ईमेलवर ओटीपी येईल. व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर तुम्हाला माहिती द्यावी लागेल. पेमेंट प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर बुकिंग पुर्ण होईल. ग्राहकांना सर्च फ्लाईटच्या मुख्य पानावर अनेक ऑफर देखील दिसतील.

Leave a Comment