500 कामगारांना घरी पाठवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी केली 3 विमानांची व्यवस्था

बॉलिवूड कलाकार लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी मदत करत आहेत. सोनू सूदनंतर आता अमिताभ बच्चन देखील कामगारांच्या मदतीसाठी पुढे आले असून, त्यांना 500 कामगारांना वाराणसीला जाण्यासाठी तीन विमानांची व्यवस्था केली. या आधी देखील त्यांना उत्तर प्रदेशमधील कामगारांना घरी जाण्यासाठी बसची सोय केली होती.

या कामगारांसाठी इंडिगो चार्टेड प्लेनची व्यवस्था करण्यात होती. या विमानाने बुधवारी सकाळी उड्डाण घेतले. कामगारांना रेल्वेने घरी पाठवण्याची योजना होती, मात्र ती योजना कामी आली नाही. या सर्व विमानांची व्यवस्था स्वतः अमिताभ बच्चन यांच्या देखरेखेखाली पार पडली. याशिवाय पश्चिम बंगाल, बिहार, तामिळ नाडू आणि इतर राज्यातील कामगारांना घरी पाठवण्यासाठी देखील अमिताभ बच्चन विमानाची सोय करणार आहेत.

दरम्यान, या आधी देखील बच्चन यांनी शेकडो कामगारांना घरी पाठवण्यासाठी 10 बसची सोय केली होती.

Leave a Comment