ऑड-इव्हन फॉर्म्युलानुसार 6 टप्प्यात सुरू होणार शाळा-महाविद्यालये


नवी दिल्ली : देशभरातील शाळा व महाविद्यालये कोरोना व्हायरसमुळे बंद ठेवण्यात आली होती. आता केंद्र आणि राज्य सरकार पुन्हा शाळा महाविद्यालये सुरु करण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहेत. पालक आणि शिक्षकांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे या संदर्भात काही गाइडलाइन्स केंद्र सरकारने जारी केल्या आहेत.

केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाड्यांसारखाच आता शाळेत आणि विद्यार्थ्यांसाठी ऑड-इव्हन फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार शाळा सुरु झाल्यानंतर ऑड इव्हन रोल नंबरप्रमाणेच विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जाईल, त्याचबरोबर शाळा या देखील दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू करण्यात येतील. शाळेत पोहोचण्यासाठी वर्गानुसार 10-10 मिनिटांच्या अंतराने विद्यार्थ्यांना वेळा ठरवून दिल्या जातील, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल. तर बंद खोलीत तास घेण्याऐवजी मोकळ्या जागेत किंवा मोकळ्या वर्गात शिकवण्याची शिफारसही करण्यात आल्याचे या गाइडलाइन्समध्ये करण्यात आली आहे.

काय आहेत मार्गदर्शकतत्वे

  • 11 वी आणि 12वीचे वर्ग पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्यात येणार आहेत
  • 9 वी आणि 10 वीचे वर्ग त्यानंतर सुरू कऱण्यात येतील.
  • 6वी ते इयत्ता 8वी पर्यंतचे वर्ग तिसऱ्या टप्प्यात 2 आठवड्यांनंतर सुरू करण्यात येतील.
  • 3री ते 5वीचे वर्ग तीन आठवड्यांनंतर चौथ्या टप्प्यात सुरू करण्यात येतील.
  • पहिली आणि दुसरीचे वर्ग पाचव्या टप्प्यात सुरू करण्यात येणार येतील.
  • नर्सरी आणि केजीचे वर्ग आठवड्यांनंतर सहाव्या टप्प्यात परवानगी मिळाल्यानंतर सुरू करण्यात येतील.
  • रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील वर्गमात्र ग्रीन झोन होईपर्यंत बंद राहणार आहेत.

शाळांसाठी विशेष मार्गदर्शकतत्वे

  • 6 फूटांचं अंतर आणि सोशल डिस्टन्स बंधनकारक
  • एका वर्गात 30 ते 35 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असू नयेत
  • वर्गाचे दार-खिडक्या उघड्या असाव्यात.
  • सम-विषम रोल नंबरनुसार विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे.
  • विद्यार्थ्यांच्या जागा बदलू नयेत. रोज त्यांना गृहपाठ देणे आवश्यक.
  • शाळेत प्रवेश केल्यानंतर स्क्रिनिंग, सॅनिटायझेशन सर्व प्रक्रिया करणे अत्यावश्यक
  • विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व गोष्टी, खाण्याचे पदार्थ आपल्यासोबत घेऊन यावेत. कोणाशीही शेअर करू नयेत.

Leave a Comment