रोनाल्डोला मागे टाकून एम्बाप्पे ठरला सर्वात मौल्यवान खेळाडू

फोटो साभार डेक्कन क्रोनिकल

मुळचा कॅरेबियन पण, फ्रांस फुटबॉल क्लब पॅरीस सेंट जर्मेनकडून खेळत असलेला २१ वर्षीय फुटबॉलपटू किलीयान एम्बाप्पे जगातला सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याचे मूल्य २५९.२ दशलक्ष पौंड म्हणजे तब्बल २४९० कोटी रुपये ठरल्याचे फुटबॉल ऑब्झर्व्हेटरीच्या अहवालात म्हटले गेले आहे. या यादीत लियोनेल मेस्सी २२ व्या स्थानावर तर युवेंन्टकडून खेळणारा  महान आणि महाग खेळाडू क्रीस्तीयानो रोनाल्डो ७० व्या स्थानावर आहे.

या अहवालात युरोप मधील पाच टॉप लीग, बुंदे सलीगा, इंग्लिश प्रीमियर लीग, ला लीगा, सिरी ए व ली १ यातील २०-२० सर्वात महाग खेळाडूंची यादी सादर केली गेली. त्यात जगव्यापी करोना साथीचा परिणाम या खेळाडूंच्या मूल्यावर सुद्धा झाल्याचे दिसून आले. या यादीत २२ व्या स्थानी असलेल्या लियोनेल मेस्सीचे मूल्य १००.१ दशलक्ष पौंड म्हणजे ९६१ कोटी तर रोनाल्डोचे ६०.८ दशलक्ष पौंड म्हणजे ६०३ कोटी रुपये असल्याचे म्हटले गेले आहे.

मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या मध्ये नेमार ज्युनिअर असून त्याचे मूल्य ८२.७ दशलक्ष पौंड म्हणजे ७९४ कोटी आहे आणि या यादीत तो ३७ व्या नंबरवर आहे. टॉप तीन मध्ये एम्बाप्पे नंतर दोन नंबरवर मँचेस्टर सिटीचा रहीम स्तलिंग दुसऱ्या नंबरवर असून त्याचे मूल्य १८६९ कोटी तर तीन नंबरवर बोलेसिया डॉर्टमंडचा जेदोन सेन्चो असून त्याचे मूल्य आहे १७२० कोटी.

Leave a Comment