महाग शहर यादीत यंदाही मुंबई अव्वल

फोटो साभार मिलेनियम पोस्ट

भारताची आर्थिक राजधानी मुंबई यावर्षीही महाग शहरांच्या यादीत देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. मर्सर २०२०च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व्हेक्षणात मुंबई जगात महाग शहराच्या यादीत ६० व्या क्रमांकावर आहे. तर आशिया मध्ये मुंबई महाग शहरांच्या यादीत १९ व्या क्रमांकावर आहे.

देशातील महाग शहरांच्या यादीत मुंबई नंतर दिल्ली आणि चेन्नई यांचा नंबर आहे. दिल्ली जागतिक महाग शहरांच्या यादीत १०१ तर चेन्नई १४३ व्या स्थानावर आहे. या यादीत बंगलोर १७१, कोलकाता १८५ क्रमांकावर असून ती सर्वात कमी महाग शहरे ठरली आहेत.

जागतिक यादीत हॉंगकॉंग महाग शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तुर्कमेनिस्तान मधील अश्काबाद दोन नंबरवर, जपानचे टोक्यो तीन नंबरवर स्विझर्लंडचे ज्युरीख चार तर सिंगापूर पाच नंबरवर आहे. अमेरिकेचे न्युयॉर्क या यादीत ६ तर चीनचे शांघाई ७ नंबरवर आहे. ८ नंबरवर स्विझर्लंडचे बर्न, जेनेवा ९ नंबर तर चीनची राजधानी बीजिंग १० नंबरवर आहे.

सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर तुनिसियाचे तुनिस, नामिबियाचे विंडहोक दोन नंबरवर, तीन नंबरवर उज्बेकीस्तानचे ताश्कंद, किर्गीज्स्तानचे विश्केक चार नंबरवर तर पाकिस्त्सनचे कराची ५ नंबरवर आहे.

Leave a Comment