भारतीय युजर्ससाठी ट्विटरचे नवे फ्लीट फिचर लाँच

फोटो साभार जागरण

ट्विटरने भारतीय युजर्स साठी नवीन फ्लीट फिचर लाँच केले असून त्यामुळे युजर्स त्यांच्या फॉलोअर्स सह नवीन पद्धतीने कम्युनिकेट करू शकणार आहेत. यापूर्वी हे फिचर ब्राझील आणि इटलीतील युजर्ससाठी लाँच झाले असून त्यानंतर हे फिचर लाँच होणारा भारत तिसरा देश बनला आहे.

यामुळे अन्य सोशल मिडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच या नव्या फिचरच्या सहाय्याने युजर फ्लीटच्या माध्यमातून पोस्ट केलेले फोटो, अन्य संदेश २४ तास पाहू शकतील मात्र २४ तासानंतर प्रोफाईलवरून ते आपोआप गायब होतील. या फिचरची खासियत म्हणजे शेअर केलेल्या माहितीवर रीट्विट, लाईक, कॉमेंट करता येत नाही.

सध्या या फिचरचे टेस्टिंग सुरु असून ते अँड्राईड आणि आयओएस वरच उपलब्ध आहे. याची आणखी एक खासियत म्हणजे जर तुम्हाला कुणी फॉलो करत असेल तर तुमचे फ्लीट नेहमी तुमच्या फॉलोअरच्या टाईमलाईन मध्ये टॉप वर राहणार आहे. त्यामुळे तुमचा फॉलोअर तुमची महत्वाची माहिती मिस करू शकणार नाही.

फ्लीटच्या माध्यमातून केलेल्या पोस्टच्या खाली क्लिक करून कुणी तुमचे फ्लीट पाहिले हे कळणार आहे. ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष महेश्वर म्हणाले, भारत ट्विटरसाठी महत्वाचा बाजार आहे कारण जागतिक स्तरावर सर्वाधिक वेगाने वाढणारे दर्शक भारतीय बाजारात आहेत. संवादाची एक नवी पद्धत फ्लीट मुळे युजरना मिळणार आहे.

Leave a Comment