अडाणी ग्रीनला सर्वात मोठ्या पॉवर प्रोजेक्टचे कंत्राट
फोटो साभार भास्कर
अडाणी ग्रीन एनर्जीला मंगळवारी जगातील सर्वात मोठ्या पॉवर प्रोजेक्टचे कंत्राट मिळाले आहे. ८ हजार मेगावॉट सौर प्रकल्प उभारणीसाठी कंपनी ४५३०० कोटिंची गुंतवणूक करणार असून भारतीय सौर उर्जा निगम कडून हा प्रकल्प उभारला जात आहे. या नव्या कंत्राटामुळे २०२५ पर्यंत ही जगातील सर्वात मोठी रिन्युएबल एनर्जी कंपनी बनणार आहे. या शिवाय जादा २ गिगावॉट सोलर सेल निर्मिती कंपनी करू शकणार आहे. अर्थात याचा फायदा निर्मिती क्षमता वाढण्यासाठी होणार आहे.
या नव्या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष ४ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. अडाणी ग्रीन एनर्जीची क्षमता १५ गिगावॉटने वाढेल आणि २०२५ पर्यंत ती २५ गिगावॉटपर्यंत पोहोचेल. पुढच्या पाच वर्षात त्यासाठी कंपनीला १.१२ लाख कोटी रुपये गुंतवावे लागणार आहेत. २ गिगावॉटचा पाहिला टप्पा २०२२ पर्यंत पूर्ण केला जात असून बाकी ६ गीगावॉट २०२५ पर्यंत दरवर्षी २ गीगावॉट या प्रमाणात पूर्ण होणार आहेत. जागतिक स्तरावर घोषित ही सर्वात मोठी सिंगल साईट परियोजना आहे.