मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात विविध राज्यात आणि खासकरुन मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद पुढे आल्यामुळे चर्चेत आला. सोनू सूदने आतापर्यंत हजारो परप्रांतीय मजुरांची सुखरूप घरवापसीत मदत केली आहे. पण सोनू सूदचा मुखवटा वापरून काही राजकीय मंडळी ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून केला होता.
सोनू सूद; संजय राऊतांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील लगावला टोला
डिअर सोनू सूद,
राऊत कडे लक्ष देऊ नकोस, तू खूप चांगलं काम करत आहेस.लक्षात ठेव आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही…..🤣😂
साभार – Whatsapp— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 8, 2020
मनसेसह भाजपने देखील संजय राऊत यांच्या या आरोपानंतर त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यातच आता सोनू सूदवर केलेल्या टिप्पणीवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील टोला लगावला आहे. यासंदर्भात चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, डिअर सोनू सूद तू संजय राऊतांकडे लक्ष देऊ नकोस. तू खूप चांगले काम करत आहे. आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नसल्याचे म्हणत संजय राऊतांना चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे