हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातून चीनचा खोटारडेपणा उघड


लंडन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार कोरोना व्हायरस हा चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरल्याचा आरोप केला जात असतानाच आता ऑगस्ट महिन्यातच चीनमध्ये कोरोना पसरण्यास सुरुवात झाल्याचे हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातून असे दिसून आले आहे. त्यांना याचे पुरावे देखील सापडले आहे. दरम्यान, 31 डिसेंबर रोजी जगाला चीनने कोरोना संसर्गाची माहिती दिली होती.

कोरोनाचे जगभरात जवळपास 70 लाखांहून अधिक रुग्ण आहेत. तर या जीवघेण्या रोगामुळे 4 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनने कोरोनाबाबत खरी माहिती लपवल्याचा आरोप अमेरिकेसह कित्येक देशांनी केला आहे. पण हे आरोप खोटे असल्याचे चीनने वेळोवेळी सांगितले आहे. पण हार्वर्डच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, डिसेंबरमध्ये नाही तर त्याआधीच चीनमध्ये व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली होती.

कमर्शियल सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीने या संशोधन पथकाने वुहान शहराच्या काही फोटोंचा अभ्यास केला आहे. ती चित्रे 2019 ऑगस्ट मधील होती. वुहान शहरातील रुग्णालयांच्या बाहेर मोठ्या संख्येने वाहने दिसत आहेत. याआधीच्या महिन्यांत आणि वुहानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अशी गर्दी केवळ संसर्गामुळे दिसून आली आहे. अभ्यासानुसार कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वीच चीनमध्ये त्याचा प्रसार झाला होता.

संशोधनानुसार ही देखील शक्यता वर्तवली जात आहे की, याची माहिती स्वतः चीनला देखील नव्हती. संशोधनानुसार, ऑगस्टपासून वुहानच्या पाच मोठ्या रुग्णालयांच्या बाहेर वाहनांची मोठी गर्दी होती. असेही होऊ शकते की जे रुग्णालयात पोहोचले त्यांना हवामानामुळे खोकला-ताप असावा. कोरोनाची लक्षणे देखील सामान्य आहेत आणि डॉक्टरांना याबद्दल कळाले नसावे.

याबाबत अधिक माहिती देताना या संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. जॉन ब्राउनस्टीन म्हणाले की संशोधनातून बरीच मदत झाली. व्हायरसचे उद्दीष्ट समजून घेण्यासाठी हे महत्त्वाचे असून ऑक्टोबरमध्ये काहीतरी घडले होते. कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापूर्वी वुहानमधील रुग्णालयात खूप गर्दी झाली होती. चीनने डिसेंबर 2019 च्या सुरूवातीस न्यूमोनियासारख्या आजाराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले होते. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाची अधिकृत घोषणा 31 डिसेंबर रोजी चीनने केली.

Leave a Comment