2005 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आपल्याला बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता, असा धक्कादायक खुलासा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केला आहे. त्याने हेलो अॅपवर लाईव्ह चॅट दरम्यान खुलासा केला की, 2005 साली मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत पाठवण्यात आले होते. एका महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली अडकवण्यात आले होते.
टीम मॅनेजमेंटनेच मला बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली फसवले होते – शोएब अख्तरचा धक्कादायक खुलासा

शोएबला 2005 साली अनफिट असल्याचे कारण सांगत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत पाठवण्यात आले होते. आता 15 वर्षांनी त्या दौऱ्या दरम्यान काय झाले होते, याची माहिती शोएब अख्तरने दिली आहे. त्याने सांगितले की, 2005 साली मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत पाठवले. माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप लावला होता. संघातील एका सहकार्याचे महिलेसोबत काही गैरसमज झाले होते. मात्र पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाने त्या मुलाचे नाव लपवले.

त्याने सांगितले की, माझ्यावर हे आरोप करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या क्रिकेटरने हे केले होते. त्या क्रिकेटपटूचे नाव व्यवस्थापन आणि कर्णधाराने लपवले व मला परत पाठवले. मी पीसीबीला त्याबाबत विचारले, मात्र त्यांनी त्या क्रिकेटपटूचे नाव जाहीर केले नाही व माझे नाव हटवले नाही. सर्वांनी मला संशयाने पाहिले. सर्वांना वाटले मीच तो प्ले बॉय आहे. मात्र जो यासाठी जबाबदार होता तो त्यावेळी संघातील सर्वात प्रामाणिक मुलगा मानला जात असे. संघाला त्याचे नाव समजले होते.