दक्षिण कोरियावर नाराज उत्तर कोरिया, तोडले सैन्य आणि राजकीय संबंध

उत्तर कोरियाने आपला प्रतिस्पर्धी देश दक्षिण कोरियाबरोबर सर्व सैन्य आणि राजकीय संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाच्या सीमेवरून उत्तर कोरियात पत्रके फेकल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 2018 नंतर दोन्ही कोरियन देशांमधील संबंध सुधारताना दिसत होते. उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांच्यामध्ये तीनवेळा शिखर वार्ता समेंलन देखील झाले आहे.

Image Credited – TRT World

संबंध तोडण्याचा पहिला टप्पा म्हणजे उत्तर कोरिया दोन्ही देशांमधील संपर्क लाईन बंद करणार आहे. दोन्ही देशांमध्ये संपर्क लाईन ही मध्यस्थाचे काम करत असे. तसेच राष्ट्राप्रमुखांसाठीच्या हॉट लाईनला देखील बंद केले आहे. उत्तर कोरियाचे म्हणणे आहे की त्यांचे लोक दक्षिण कोरियाच्या विश्वासघाती वागणुकीमुळे नाराज आहेत. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी किम जोंग उन यांची प्रतिमा खराब केली आहे.

Image Credited – NDTV

मागील आठवड्यात किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाला धमकी दिली होती त्यांच्या देशातील उत्तर कोरियाच्या फुटरितावाद्यांवर कारवाई न केल्यास संबंध तोडण्यात येतील. दक्षिण कोरियाच्या काही संघटना उत्तर कोरियाच्या हुकुमशाही शासनाचा विरोध करतात. अनेकदा दोन्ही देशांच्या सीमेवर पत्रक, चिठ्ठी, फुगे फेकले जातात. या पत्रक, चिठ्ठ्यांमध्ये किम जोंग उन यांच्या विरोधात आपत्तीजनक भाषा आणि उत्तर कोरियाविरोधात लिहिलेले असते.

Leave a Comment