ज्योतिरादित्य सिंधिया आईसह रुग्णालयात दाखल


नवी दिल्ली : अचानक तब्येत बिघडल्यामुळेमध्य प्रदेशातील भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये ज्योतिरादित्य यांच्यासह त्यांच्या आईलाही दाखल केल्याचे वृत्त आहे. दोघांनाही ताप आणि खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे दोघांचीही कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.

सोमवारी संध्याकाळी ज्योतिरादित्य सिंधिया यांची तब्येत बिघडल्यानंतर ते उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात पोहोचले होते. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आता त्यांना अॅडमिट करून घेण्यात आल्यानंतर त्यांची आज सकाळपासून विविध प्रकारची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. यासंदर्भातील वृत्त आऊटलूकने दिले आहे.

दरम्यान, याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही तब्येत अचानक बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारपासून अरविंद केजरीवाल यांचीही तब्येत बिघडली असून त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. ताप आणि खोकल्याचा त्रास अरविंद केजरीवाल यांना होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे केजरीवाल यांची आज कोरोना चाचणी झाली. अद्याप याबाबतचा अहवाल आलेला नाही.

Leave a Comment