ह्रदयाला देखील स्वतःचा मेंदू असल्याचे आता समोर आले असून, हे सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिकांनी ह्रदयाचा 3डी नकाशा देखील बनवला आहे. हा मेंदू केवळ ह्रदयासाठीच काम करतो. ह्रदयाच्या आतील या मेंदूला इंड्राकार्डिएक नर्व्हस सिस्टम म्हणतात. मेंदू जे सांगेल तेच ह्रदय करते. हे ह्रदयाची आतील संचार व्यवस्थेला सुरळीत चालवण्याचे काम करते.
ह्रदयाला देखील असतो मेंदू, वैज्ञानिकांनी बनवला 3डी नकाशा
ही नर्व्हस सिस्टम ह्रदयाला व्यवस्थित ठेवते. जेणेकरून ते योग्यरित्या काम करेल. कधी किती रक्त पुरवठा करायचा हे सर्व ह्रदयाला सांगते. याच मेंदुमुळे ह्रदय अनेक आजारांपासून वाचते. फिलाडेल्फिया स्थित थॉमस जेफरसन यूनिव्हर्सिटीचे बायोलॉजिस्ट जेम्स शॉबर आणि त्यांच्या टीमने उंदराच्या ह्रदयाचा अभ्यास केला. यानंतर नाइफ एज स्कॅनिंग मायक्रोस्कोपीद्वारे ह्रदयाचे फोटो काढण्यात आले.

या फोटोंच्या मदतीने ह्रदयाचा थ्रीडी मॅप बनवले. या थ्रीडी मॅपमध्ये ह्रदयाचे सर्व भाग स्पष्ट दिसत आहेत. येथेच पिवळ्या रंगात ह्रदयाचा मेंदू दिसत आहे. जेम्स शॉबर म्हणाले की, या नकाशाच्या मदतीनेच समजेल की आजार कोणत्या भागाला किती प्रभावित करतात. त्यानुसार उपचार घेता येतील. हा मेंदू ह्रदयाच्या वरती डाव्या बाजूला असतो. येथून ह्रदयाच्या डाव्या आणि उजव्या भागातील नसांना आदेश दिले जातात.

शॉबर यांनी सांगितले की, त्यांचा रिपोर्ट आयसायन्समध्ये 26 मे ला प्रकाशित झाला आहे. हा नकाशा न्यूरोलॉजी आणि कार्डियोलॉजी दरम्यान एक पूल म्हणून कार्य करेल. या मदतीने जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिक ह्रदय संबंधित आजारावरील उपचार शोधू शकतील.