मजूराचा मुलगा आहे 1 कोटी जिंकणारा टिक-टॉक स्टार बाबा जॅक्सन, अमिताभ-ऋतिक देखील झाले फॅन

फ्लिपकार्टची एंटरटेनर नंबर वन स्पर्धा जिंकणारा टिकटॉक स्टार बाबा जॅक्सन उर्फ युवराज सध्या चर्चेत आहे. मात्र ही स्पर्धा जिंकल्याने तो प्रसिद्ध झाला आहे असे नाही. या आधी देखील अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन व टाइगर श्रॉफ या कलाकारांनी त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. युवराजचे वडील मजूर असून, ते घरात टाईल्स लावण्याचे काम करतात. लॉकडाऊन दरम्यान फ्लिपकार्टने एंटरटेनर नंबर वन स्पर्धा सुरू केली होती. ज्या दर आठवड्याला एका विजेत्याला 10 लाख रुपये आणि मेगा विजेत्याला 1 कोटी रुपये बक्षीस मिळणार होते. युवराज या स्पर्धेचा विजेता ठरला आहे.

टिकटॉकवर त्याचे 10 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने सांगितले की, मला कोणीही डान्स शिकवला नाही. मुन्ना मायकल चित्रपट बघून डान्स करण्यास सुरूवात केली. टायगर श्रॉफला बघून डान्स करायला सुरूवात केली होती. प्रभूदेवा देखील माझ्यासाठी प्रेरणा आहे. हे शिकण्यासाठी 5 महिने लागले.

कलाकारांनी व्हिडीओ शेअर केले याबाबत तो म्हणाला की, मला यावर विश्वासच बसत नाही. कारण ते एवढे मोठे सेलिब्रेटी आहेत की आम्ही त्यांचे व्हिडीओ दुसऱ्यांच्या घरी जाऊन दाखवत असे. व्हिडीओ शेअर करण्यासाठी मी अमिताभ सरांचे आभार मानतो.

Image Credited – Aajtak

युवराजला लहानपणापासून बॉक्सिंगची आवड होती. मात्र कुटुंबामुळे सर्व सोडावे लागले. पालकांचे इंजिनिअर बनवण्याचे स्वप्न होते. मात्र डान्सचे एवढे वेढ लागले की मायकल जॅक्सनप्रमाणे आरशात पाहून डान्स करू लागलो.

Leave a Comment