लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्यामुळे डबल पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक विकत आहे केळी

कोरोना व्हायरसमुळे जगात आतापर्यंत लाखो लोंकाचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देखील अनेकांचा आयुष्य बदलून केले आहे. अनेकांना या काळात नोकरी गेल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय, उद्योग-धंदे बंद झाल्याने लाखो नोकऱ्या गेल्या आहेत. यातीलच एक व्यक्ती म्हणजे पट्टेम वेंकट सुब्बैया.

43 वर्षीय सुब्बैया हे आंध्र प्रदेशच्या नेल्लोर नगर येथील रहिवासी आहेत. ते मागील 15 वर्षांपासून येथे शिक्षक म्हणून नोकरी करत होते. मात्र कोरोना संकटाच्या काळात त्यांची नोकरी गेली. डबल पोस्ट ग्रॅज्युएट असणारे सुब्बैया कुटुंबाचे पोट भरण्यासाठी केळी विकत आहेत. मार्चअखेरपर्यंत सुब्बैया महिन्याला जवळपास 16 हजार रुपये पगार मिळवत असे. दोन वर्षांपुर्वी मुलाच्या उपचारासाठी त्यांनी 3 लाखांचे कर्ज घेतले होते, जे ते आजही फेडत आहेत.

सुब्बैया यांनी बीएडसह राज्यशास्त्र आणि तेलगूमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. त्यांना 6 आणि 5 वर्षाची दोन मुले आहेत. त्यांनी सांगितले की, एप्रिल-मे महिन्यात कॉलेजने सर्व शिक्षकांसमोर पगारासाठी एक अट ठेवली. पगार तेव्हाच मिळेल ज्यावेळी पुढील वर्षीसाठी विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन देण्यात येईल. सर्व शिक्षकांना अ‍ॅडमिशनसाठी 10 नवीन विद्यार्थ्यांना शोधण्यास सांगितले. मात्र कोरोनाच्या भितीने कोणी अ‍ॅडमिशनसाठी होत नव्हते. त्यामुळे 50 टक्के पगार देऊन सुब्बैया यांना नोकरीवरून काढण्यात आले.

मित्राला ही स्थिती सांगितल्यावर त्याने सुब्बैया यांना केळी विकण्यास सांगितले. 20 मे पासून सुब्बैया हे केळी विकत आहेत. आता हेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे.

Leave a Comment