हा सुपर रग्बी सामना पाहण्यासाठी येणार 35000 लोक

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांनी देश कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. येथे मागील 18 दिवसांपासून एकही नवीन कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. त्यामुळे सरकारने लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास परवानगी दिली आहे. लवकरच क्रिडा स्पर्धांचे देखील येथे आयोजन केले जाणार आहे.

Image Credited – newskarnataka

डुनेडिन येथे हायलँडर्सविरुद्ध चिफ्सचा रग्बी सामना पाहण्यासाठी तब्बल 20 हजार प्रेक्षक येण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस महामारीनंतर आयोजित करण्यात आलेला हा पहिला सर्वात मोठा रग्बी सामना आहे.

Image Credited – Ultimate Rugby

सुपर रग्बी ओटियारोहा रग्बी यूनियनची पहिली मोठी स्पर्धा आहे. कोरोना व्हायरसनंतर ही पहिली अशी स्पर्धा आहे, जेथे प्रेक्षकांच्या उपस्थितीवर कोणतीही मर्यादा नाही. दुसरीकडे ऑकलँड येथील ब्ल्यूज विरुद्ध हरिकेन्समध्ये रविवारी होणारा सामना पाहण्यासाठी 35 हजार लोक येण्याची शक्यता आहे. कारण या सामन्यात राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत.

Leave a Comment