कधी नष्ट होणार कोरोना ? या 511 विशेषज्ञांनी दिले उत्तर

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात कोरोना व्हायरसचे संकट वाढत चालले आहे. काही देशांमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी झाला असला तरी असे अनेक देश आहेत जेथे आकडा वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्सने महामारीच्या 511 विशेषज्ञांमध्ये एक सर्वे केला व हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की येणाऱ्या काळात कोरोनाचा आयुष्यावर कसा परिणाम होणार ? या तज्ञांनी कोणतीही गाईडलाईन जारी केली नाही तर स्वतःच्या खाजगी आयुष्यावरील परिणामांबाबत सांगितले.

Image Credited – Aajtak

यातील अनेक तज्ञांनी आतापासूनच डॉक्टरांना भेटणे व छोट्या समूहामध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली आहे. मात्र अधिकांश तज्ञांनी सांगितले की ते जोपर्यंत लस अथवा उपचार येत नाही तोपर्यंत मोठे कॉन्सर्ट, क्रिडा स्पर्धा, धार्मिक कार्यक्रमात जाणार नाही. तर काही तज्ञांचे म्हणणे आहे की ते आता कधीच लोकांशी गळाभेट घेणार नाही व हात मिळवणार नाही. कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राहत आहे. प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार कसे होत आहेत, हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. याच आधारावर निर्णय घेतला जाईल, असे तज्ञ म्हणाले. 60 टक्के विशेषज्ञांनुसार, महत्त्वाचे नसेल तरी उन्हाळ्यात डॉक्टरांची भेट घेणार. 29 टक्के तज्ञांनी म्हटले की अशा स्थितीमध्ये ते 3 ते 12 महिने वाट पाहतील. तर 11 टक्के म्हणाले की ते 1 वर्षांपेक्षा अधिक काळ वाट पाहतील.

Image Credited – Aajtak

जवळील एखाद्या ठिकाणी गाडी चालवून सुट्टी घालवण्याबाबत 56 टक्के तज्ञ म्हणाले की, त्यांना उन्हाळ्यात असे करायला आवडेल. 26 टक्के म्हणाले की ते 3 ते 12 महिन्यांनी असे करतील. तर 18 टक्के तज्ञ म्हणाले की एक वर्षांनंतर छोट्याशा ट्रीपवर जातील. 19 टक्के तज्ञांनी सांगितले की ते सलूनमध्ये जाऊन केस कापण्यासाठी 1 वर्ष वाट पाहतील. तर 39 टक्के 3 ते 12 महिने वाट पाहतील. 41 टक्के तज्ञांनी उन्हाळ्यातच सलूनला जाणार असल्याचे सांगितले.

Image Credited – Forbes

छोट्याशा डिनर पार्टीबाबत 46 टक्के तज्ञ म्हणाले की, ते 3 ते 12 महिन्यानंतर असे करतील. तर 32 टक्के उन्हाळ्यातच डिनर पार्टी आयोजित करण्यास तयार आहेत. मात्र 21 टक्के एक वर्ष पाठवण्यास तयार आहेत. उन्हाळ्यात केवळ 20 टक्के तज्ञांनी विमान प्रवासात रस दाखवला. 44 टक्के तज्ञ 3 ते 12 महिन्यानंतर विमान प्रवास करतील, तर 37 टक्के एक वर्षांपेक्षा अधिक वाट पाहण्यास तयार आहेत.

Leave a Comment