पुण्यातील ग्राहक पेठेत ‘स्वदेशी’ आणि ‘विदेशी’ पद्धतीने वस्तूंची अलगीकरण


पुणे – कोरोनाचा प्रादुर्भाव हा देशासह राज्यात देखील मोठ्या प्रमाणात झाला असून राज्यातील कोरोनाचा प्रसार जास्त होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारकडून यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.


दरम्यान राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेननुसार आता राज्यात काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच दरम्यान आता पुण्यातील ग्राहक पेठ दुकानाने त्यांच्याकडील वस्तूंवर ‘स्वदेशी’ आणि ‘विदेशी’ असे लेबल लावले आहेत. तसेच ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ या मोहिमेला सुद्धा ग्राहक पेठ यांनी पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत अधिक स्पष्टीकरण देत ग्राहक पेठने असे म्हटले आहे की, कारण भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँन्ड कोणता आहे हे नागरिकांना माहित नसल्यामुळेच दुकानात स्वदेशी आणि विदेशी अशी वर्गवारी करुन गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment