चीनने अमेरिकेवर केला आरोप, आमच्या येथे पसरवले हे ‘एलियन’ व्हायरस

अमेरिकेने चीनवर जगभरात कोरोना व्हायरस पसरवण्याचा आरोप केला आहे. तर आता चीनने देखील अमेरिकेवर एक खास व्हायरस पसरवण्याचा आरोप केला आहे. चीनने म्हटले आहे की, अमेरिकेने त्यांच्या देशात एलियन प्रजाती पाठवली आहे. ज्यामुळे चीनमधील पर्यावरण, जीव-जंतू नष्ट होत आहेत. या एलियन प्रजाती व्हायरसच्या असून, त्या पीक खराब करत आहेत.

Image Credited – Aajtak

चीनच्या पर्यावरण मंत्रालयाशी संबंधित नानजिंग इंस्टिट्यूट ऑफ एनवायरॉमेंटल सायन्सचे असोसिएट रिसर्चर मा फांगझोउ म्हणाले की, चीनमध्ये 660 इन्वेसिव्ह एलियन स्पीसीज म्हणजे आक्रमक एलियन प्रजाती आढळल्या आहेत. यातील 71 तर अधिक धोकादायक आहेत. यामुळे चीनमधील स्थानिक प्रजातींना धोका आहे. यातील 51 टक्के प्रजाती अमेरिकेतून चीनमध्ये आल्या आहेत. ज्यामुळे चीनच्या पर्यावरण, इकोलॉजी आणि जीव-जंतूवर वाईट परिणाम होत आहे.

Image Credited – Aajtak

मा फांगझोउ म्हणाले की, या प्रजाती आंतरराष्ट्रीय मार्गाने येथे पोहचल्या आहेत. यातील सर्वात धोकादायक पोपलर मोजॅक व्हायरस आहे. यामुळे पीक खराब होत आहेत. हा व्हायरस अमेरिकेतून बियाणे आणि झाडांद्वारे देशात आला. आक्रमक एलियन प्रजाती एका देशातून दुसऱ्या देशात धान्य, तेल, कार्गो अथवा सामानाद्वारे जातात. यानंतर त्या तेथे विकसित होतात, अथवा हवामानासोबत नष्ट होतात.

Image Credited – Aajtak

फांगझोउ म्हणाले की, चीनमध्ये राइस ग्रास प्रजातीचा एलियन प्रजातीमध्ये समावेश आहे. ही प्रजाती चीनच्या किनाऱ्यावरील भागात वेगाने पसरत असून, ही अमेरिकेतून येथे आली आहे. याच प्रकारे मायक्रोएल्गी आणि सी-बीन्स देखील वेगाने पसरत आहे. सर्वेक्षणात आढळले की 2015 इन्वेसिव्ह एलियन प्रजाती चीनच्या 67 नॅशनल रिझर्व्हमध्ये पसरल्या आहेत. यातील 48 प्रजातींना धोकादायक यादीत टाकण्यात आले आहे.

Leave a Comment