आता जगातील कोणत्याही कोपऱ्यातून काढता येणार ग्रुप सेल्फी, अ‍ॅपलला मिळाले हे धमाकेदार पेटंट

आपल्या नाविन्यपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या टेक कंपनी अ‍ॅपलला आता आणखी एका खास गोष्टीचे पेटेंट मिळाले आहे. अमेरिकेच्या पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसने अ‍ॅपलच्या व्हर्च्युअल सेल्फी पेटंटला मंजूरी दिली आहे. या पेटंटचा अर्थ की येणाऱ्या काळात आयफोन युजर्स आपल्या मित्रांसह जगातील कोणत्याही कोपऱ्यातून ग्रुप सेल्फी काढू शकतील.

सर्वसाधारणपणे ग्रुप सेल्फीसाठी सर्वजण एकाच ठिकाणी असणे गरजेचे असते. मात्र अ‍ॅपलच्या या पेटंटनंतर ही पद्धत बदलणार आहे. अ‍ॅपलने दोन वर्षांपुर्वी या पेटंटसाठी अर्ज केला होता. या पेटंट अंतर्गत कॉम्प्युटिंग डिव्हाईसचा वापर केला जाईल, जे सिंथेटिक ग्रुप सेल्फी तयार करेल.

Image Credited – Amarujala

सिंथेटिक ग्रु सेल्फी हे वेगवेगल्या सेल्फीचे एकत्रीकरण आहे. जे एकाच फोटोमध्ये मर्ज होतील. यासाठी डिव्हाईस व्हिडीओ इमेज, लाईव्ह व्हिडीओ आणि फोटोचा वापर करेल. यात युजर्सला सेल्फी एडिट करण्याचा देखील पर्याय असेल. ग्रुप सेल्फीमध्ये सहभागी होणारे सर्व युजर्स स्वतःची जागा ठरवू शकतील. सर्व युजर्सला फोनमध्ये सेल्फी काढावी लागेल आणि बॅकग्राउंडला रिमूव्ह करावा लागेल. यानंतर सर्व सेल्फींचा एकसोबत व्हर्च्युअल ग्रुप सेल्फी तयार होईल. मात्र हे फीचर आयफोन युजर्ससाठी कधी उपलब्ध होईल हे सांगण्यात आलेले नाही.

Leave a Comment