टरबुजावरून झालेल्या युद्धात गेला शेकडोंचा जीव

फोटो साभार न्यूज क्रॅॅब

प्राचीन काळापासून राज्यात, देशातून होणारी युद्धे प्रामुख्याने राज्य विस्तार, जमीन अधिकार यावरून होत किंवा वर्चस्व सिध्द करण्यासाठी होत असे इतिहास सांगतो. क्वचित कधी सुंदर राण्या याही युद्धाचे कारण बनत. पण एक टरबूज दोन राज्यातील युद्धाचे कारण बनले असेल असे कुणाच्या कल्पनेत सुद्धा येणार नाही. पण ही घटना भारतात १६४४ साली घडली होती. एका टरबुजावरून बिकानेर आणि नागौर या राजस्तानातील त्या काळाच्या दोन संस्थांनामध्ये युध्द झाले आणि त्यात शेकडो सैनिक मारले गेले होते.

३७५ वर्षांपूर्वी झालेले हे युद्ध ‘मातिरे की राड’ या नावाने ओळखले जाते. राजस्थानच्या काही भागात टरबुजाला मातीर म्हटले जाते आणि राड म्हणजे झगडा. बिकानेर संस्थानाच्या सीमेवरील गाव सीलवा येथे एक कलिंगडाची वेल होती. तिची फळे मात्र शेजारच्या नागौर संस्थानातील सीमेवरील गाव जखनिया याच्या हद्दीत येत असत. बिकानेर भागाचे म्हणणे असे की वेल आमच्या हद्दीत आहे त्यामुळे फळे आमची. तर नागौरचे म्हणणे फळे आमच्या हद्दीत म्हणून फळे आमची.

यातून निर्माण झालेल्या भांडणात दोन्ही राज्याची सैन्ये सामील झाली. त्यावेळी बिकानेरचा राजा करणसिंग एका मोहिमेवर गेला होता तर नागौरचा राजा मोघलांच्या सेवेत होता. या दोन्ही राजाना युद्ध सुरु झाल्याची माहिती नव्हती. जेव्हा युद्ध सुरु झाल्याचे समजले तेव्हा या दोन्ही राजांनी मुगल राजाला मध्यस्ती करण्याची विनंती केली, त्याचे मंडलिकपण स्वीकारले पण तोपर्यंत शेकडो सैनिकांचा जीव गेला होता.

Leave a Comment