१५ जुलैपासून सुरु होतेय अमरनाथ यात्रा, नियमावली जाहीर

फोटो साभार इंडिया टीव्ही

करोना उद्रेकामुळे यंदा पवित्र अमरनाथ यात्रा १५ जुलै ते ३ ऑगस्ट या १५ दिवसांच्या काळात होणार आहे. दरवर्षी या यात्रेचा कालावधी साधारण ४५ दिवसांचा असतो. या यात्रेसाठी अमरनाथ श्राईन बोर्डाने शुक्रवारी यात्रा मार्ग आणि यात्रेसाठीची नियमावली जाहीर केली.

शुक्रवारी बर्फानी बाबांची पहिली पूजा केली गेली. यंदा पूर्ण उंचीचे शिवलिंग गुहेत तयार झाल्याचे समजते. यावेळच्या यात्रेत ५५ वर्षांवरील यात्रेकरूना परवानगी दिली गेलेली नाही मात्र साधू संतांसाठी हा नियम नाही. यात्रा उत्तर काश्मीर मधील बालताल या एकाच मार्गाने जाणार असून यात्रेकरूना करोना मुक्त असल्याचे डॉक्टर सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. जम्मू काश्मीर सीमेवर थर्मल स्क्रीनिंग केले जाणार असून यात्रेकरूना यात्रेसाठी नोंदणी करून परवाना घ्यावा लागणार आहे.

यात्रा मार्गावर नेहमीप्रमाणे स्थानिक मदतनीस असणार नाहीत. त्यामुळे यात्रा मार्गावर यात्रेकरूंची गैरसोय होत नाही ना यावर नजर ठेवण्यासाठी बेस कॅम्प पासून हेलीकॉप्टर फिरत राहणार आहे. यंदा प्रथमच १५ दिवस बाबा बर्फानी आरतीचे लाईव प्रक्षेपण केले जाणार आहे.

Leave a Comment